मित्रहो नमस्कार मी - TopicsExpress



          

मित्रहो नमस्कार मी कु.संतोष दिवाडकर. वय 18,राहणार कल्याण. मित्रहो मी हे पण जाणतो की या पेज चे अर्धे लोक भुतांवर विश्वास न ठेवता केवळ मनोरंजन मिळवण्यासाठी गोष्टी वाचतात. मी पण यांच्याच विचाराचा होतो. भुत नसते हा विचार मी जणू मनात कुठेतरी कोरूनच ठेवला होता. पण मागे झालेल्या एका अमानवी घटनेनंमाझ्या या विचारांवर कायमचं पाणीसोडलं. माझ्या सोबत काय घडलं? . मी नुकतीच 13 वी ची परिक्षा दिली आणी मे मध्ये भरणार्या गावचा जत्रे साठी गेलो. जत्रा संपली पण तरीही आंबे,करवंद,जांभळं खाण्यासाठी थोडेदिवस गावीच थांबलो. माझे आई,वडिल आणि एक बहिण असे आम्ही चौघे जण होतो. माझं गांव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे.गावचे नाव शिळीम. . गावची जत्रा संपुन 5 दिवस लोटले होते.रोज रोज क्रिकेट चा पण कंटाळा येत होता.वाटत होते की कुठेतरी पिकनिक ला जावे. रुक्षा,सोन्या आणि भावड्या हे तिघे माझे खास दोस्त होते गावचे.माझ्या गावाजवळ 2 किल्ले होते. तिकोणा पेठ आणी दुसरा तुंग. माझा मावशीचा मुलाने तुंग किल्ला सुचवला.दिवस ठरला.घरचे पाठवणार नाहीत म्हणून मग गपचुप निघायचे ठरवले. मी सकाळी 9 ला आम्ही क्रिकेट चा नावे नाश्ता करुन निघालो. मी कशीबशी मी गाडी काढली. थोडं पुढं गेल्यावर पाहीलं की माझे दोस्त ठरल्याप्रमाणे तयारीत आलेत.त्यांनी खाण्यापिण्याचं सामान गाडीत भरलं. आणि आमची Scorpio निघाली. 11 वाजता त्या तुंग ला पोचलो.साधारण 2 पर्यंत आमचा फिरण्याचा कार्यक्रम आटपुन आम्ही खाली येऊनएका झाडाखाली जेवण केले आणि सामान गाडीत टाकले. पण इकडे या आंब्या खाली माझा मावशीचा मुलगा विकी डाराडुर झाला होता .त्याबरोबर तेतिघे आणी मी पण झोपलो.थकवा आणी सुस्ती गेली.साधारण 6 ला रुक्षा ने आम्हांस उठवले. जवळचा टाकीतल्या पाण्याने जरा आम्ही फ्रेश झालो आणि घरचा भीतेने निघालो. घढ्याळात 7 वाजत होते.आमचा प्रवास फक्त 14 किमी चा होता. पण पहिल्या 7 किमी चा रस्ता नुसता घाटाचा आणी धूराळा होता.त्यामुळे ते 7 किमी 70 किमी भासायचे.आण त्यात मी नवा कासवगतीतला चालक. उशिर होणार याची खात्री झाली. रात्री 9 वाजता आम्ही ते धोक्याचे 7 किमी ओलांडून मोरवे गावात म्हणजे जेथुन डांबरी रस्तालागतो तिथे आलो. खेडेगाव म्हणजे त्या वेळेला शुकशुकाट.आम्ही गाडीथांबवून धुऴीने माखलेली गाडि साफकेलि.कारण कोणाला कळु नये म्हणून. 3 कीमी पुढे आलो तोच गाडीचा मागचाटायर पंक्चर. मग विकी सारख्या भक्कम मुलाचा मदतीने आम्ही तासाभरात काम आटोपलं.आमची गाडी पुन्हा धावू लागली.त्यावेळी घड्याळ 11 ला खेटत आलते . आता डोंगरवाडी चा टेपाडा वरुन गाडी खाली येत होती.अंतर फक्त 1 किमी.पण इतक्यात अचानक गाडी बंदच पडली. विकी पुन्हा उतरला.त्याने इंजीनात काय तरी हातपाट केला आण गाडी चालु झाली.मग मी क्लच दाबणारइतक्यात समोर लक्ख काळोखात मध्याच पांढरा प्रकाश पेटला.आम्हाला वाटलं की गाडी येत असेल.पण तसं काही नव्हतं.आमच्या गाडीचा काचा आम्ही पटकन वर केल्या. मी तर लाईट पण बंद केली. आता अंधारात मी बाजूला बसलेल्या विकीला आवळले.आमचा मागे रुक्षा,सोन्या आणि भावड्या बसलेले.मधे बसलेल्या घाबरलेल्या भावड्याला ते दोघे बिलगले. त्यांची नी माझी समोर पहायची हिँमत नव्हती.भीतीपोटी शिव्या देत मला चलायला सांगितलं. मी पण म्हटले की तुम्ही पण वर बघा. सोसाट्याच वारा सुटला 11 वाजून गेले होते. आमचा समोर आम्हांला एकम्हतारा आमच्याकडं येताना दिसला.आम्ही खुप धाडसी नजरेने त्याचा कडं पाहत होतो. मी गाडीची लाईट लावली. आणि क्लच दाबणार तितक्यात मागचा दरवाजाचा कट कट आवाज झाला.आणि दरवाजा आपोआप उघडला.मग सोन्या ने मागे जात भित भित दार लावलं आण परत जागेवर बसला. सगळीकडे शांतता,त्यात तो वारा आमची थरकाप उडवत होता. इतक्यात खिडकीवर टक टक झाली आणि आम्ही आई आई पप्पा पप्पा करत ओरडलो.असं वाटू लागलं की कुणाची तरी गाडी यावी. भीत भीत मी पुटपुटलो,"काय पायजे?". तो म्हातारा तर साधारण माणसा सारखाच दिसत होता. विकी मलाचल पटकन चल असंच म्हणू लागला. आता माझा पाय क्लच चाचपडू लागला. देवाचा नावे ओरडत मी गियर टाकला. आणि त्याचा तावडीतुन निघालो. भीती पोटी आमची गाडी वाकडी तिकडी चालत होती.मला वाटलं आता काय खरं नाही.रात्री साधारण 12 पर्यँत गाडी घराजवळ आली. गाडीचं दार खोलून आम्ही बाहेर पडलो. आमचा सर्वाँचा घरचे जमा झालते. काळजीपोटी काहिँचा डोळ्यात अश्रृ पण होते. माझा काकांचा मुलाने माझा हातातली चावी खेचुन म्हटलं झाला गड पाहुन? आम्हि ओळखलं कि यांना कळलंय. मी काही बोलायचा आतच त्याने माझा हाताला खेचत पप्पांकडं आणलं. पप्पांनी तर काठीचं काढली. खुप मार खाल्ला. सर्वाँनी घरी मार खाल्ला. . पुढे 2 दिवसानंतर भावड्या आजारी पडला.आणि एकटक दाराकडं डोळे वटारु लागला.प्रकार भलताच होता. आम्ही पण घाबरुन सर्व प्रकार घरातल्यांना सांगितला. कांताकाकूंच्या अंगात यायचं मग त्यांनी देवाचं केलं. भावड्याला दारासमोर बसवलं त्याचावरुन लिँबू आणि कोंबडा उतरवला. 2 दिवसात तो बरा होऊ लागला. . दिवस लोटले. गावात लग्नाचा अनेक वरातीत नाचत,क्रिकेट खेळत आम्ही हा प्रकार विसरलो. मग एक दिवस आम्ही चंदन काका चा घरी मॅच पाहत बसलो. मॅच पाहता पाहता माझी नजर माझा डाविकडेचा भिँतीवर पडली. ते पाहून माझा पायाखालची जमीन सरकली आणि गोठत्या आवाजात मी त्या चौघांना तो फोटो दाखवला. ते गोंधळात पडले. आ वासुन ते फोटोकडे पाहू लागले. आणि आम्हितेथुन थेट पळ काढला. कारण त्या फोटोत तोच म्हातारा होता जो आमच्या गाडीला आडवत होता. हे आश्चर्य आम्हांला अमानवी शक्तीँचा असल्याचा पुरावा होते. त्यानंतर आम्हांला चंदन काकां कडुनच समजले की त्यांचा आजोबांचागावचा टेपाडावर जात असताना चालताचालता अकस्मात म्रृत्यु झाला होता . या घटनेनंतर आम्हाला आता गावाला रात्री भटकायची सवय पण सोडावी लागली. त्या वयस्कर माणसाचा म्रृत्यु चं कारणं वेगळंच असणार हे पण आम्ही जाणले. आजही त्या रात्रीची आठवण झाली तरी मनाची ढासळण होते. . धन्यवाद !!..
Posted on: Sat, 17 Aug 2013 18:20:32 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015