मी संकेत वरक एक गोष्ट - TopicsExpress



          

मी संकेत वरक एक गोष्ट सांगतोय. ती मी अनुभवलेली नाही, पण ह्याबद्दल खूप चर्चा झाल्या आहेत. मी अंधेरीच्या DN नगर मध्ये राहतो. माझी शाळा पण तिथेच होती. तर झालं असं, कि माझी शाळा आहे, तिथे एक main road पार केला कि प्रगत garden म्हणून आहे. खूप मोठा garden आहे त्याच्या चारही बाजूला 1२ ते १३ फीट चा एक one-way रोड आहे. त्या रस्त्याला लागुनच ४ - ४ मजल्याच्या इमारती आहेत. त्यापैकी एका building मध्ये राहणारे एक कुटुंब होते. त्यात आई बाबा भाऊ आणि बहिण असे चौघे होते. त्यांचे घर बागेच्या समोरच होते. बागेमध्ये बरीचशी झाडे होती. त्या कुटुंबामधला मुलगा call center मध्ये काम करीत असे. एकदा तो त्याच्या कामाला गेला होता. तो साधारणपणे रात्री दहा पर्यंत घरी परतत असे. पण त्यादिवशी तो रात्रीचे दीड वाजले तरीही घरो परतला नाही. आईला चिंता होत होती. ती जागीच होती. मुलाची वाट पाहत त्याची आई गेलेरीमध्येच उभी होती. तेव्हा तिने दुरून एक व्यक्ती येताना दिसला. तो तिचा मुलगा असेल, ह्या आशंकेने ती त्या मुलाला निरखून पाहत होती. तेव्हा घराच्या समोर साधारण तीस फुटावर असेले त्या garden मधील झाड अचानक हलले. तीने दुर्लक्ष केले. तेव्हा चालत येणारा मुलगा थोडाफार जवळ आला. तो तिचाच मुलगा होता. तिला आपल्या मुलाला पाहून फार बरे वाटले. आणि अचानकपणे बाजूचे झाड पुन्हा हलले. तिने त्यावर एक भयानक प्रकार पाहिला. तिने बाजूच्या झाडावर एक जोडपे बसलेले पाहिल. एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघेही त्या बाईकडे पाहून हसत होते. त्यांचे कपडे पांढरे होते. त्यांना पाहताच ती बेशुद्ध पडली. ती ८ दिवस अंथरुणात होती. त्या बागेत अशा खूप आख्यायिका आहेत. मी ह्या सर्व गोष्टी ऐकत होतो, तेव्हा त्या बागेतच होतो, आणि ते झाड माझ्यापासून थोड्याच अंतरावर होते.
Posted on: Thu, 11 Jul 2013 19:02:07 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015