रविवार सकाळची वेळ - TopicsExpress



          

SP7

रविवार सकाळची वेळ होती, तो हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता, ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली, "चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........ ... तो तिच्याकडे न पाहताच "हो"म्हणाला, आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेला, त्याच्या जवळून जाताना तिने, केसांना नाजुक झटका दिला, त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र ओला झाला, त्याने उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले, तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले, तो हळूच उठला खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात आला, तिने त्याच्याकडे बघाव म्हणून........ फ्रिजवर तबला वाजवू लागला; तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल, आणि त्याला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल; तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत तो क्षणभर तसाच थांबला, उगाच तिला आतण दुखावले म्हणून स्वतःशीच भांडला , हळूच मग मागुन जाउन मग त्याने.. तिच्या कमरेला विळखा घातला, पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन, हात त्याचा भाजला, तो कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त हसली, चावटपणाची वेडी लहर त्याच्या मनात मग उठली, त्याने तिला जखडले मिठीत, ती म्हणाली "जाऊ दया ना!"; तो म्हणाला तिला "तुला माझ्यात सामाऊ दे ना!", ती लाजून म्हणाली , "अहो अस काय करता? चहा उकळतोय!", तो म्हणाला "उकळू दे! इथे माझा जीव जळतोय!", "अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!", "कशाला उगीच काळजी करतेस तो परत म्हणाला मी आणून देइन ना!", ती उगाच कारण देत होती , तो प्रत्येक कारण उडवत होता, तिला अजुनच जवळ घेत, त्याच्या मनासारखा घडवत होता, शेवटी तिने कारण दिल , "अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..", तो म्हणालो "हो का! त्याला वाटले की माझा चावटपणा अती होतोय", तेवढ्यात दाराची कड़ी वाजली, त्याने मनातल्या मनात बाहेरच्या इसमाला शिवी घातली , तिन झटकन स्वतःला त्याच्या तावडीतुन सोडवून घेतल, आणि हळूच त्याला धक्का मारून, स्वयंपाक घराबाहेर लोटल; त्याने वैतागान दार उघडल, समोर कचरावाला दिसला, याचा खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून, तो कचरेवाला पण गालात हसला, त्याने कचरा देऊन झटकन दार लावून घेतल, पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र घडणार आहे ,अस त्याला वाटल, पाहिले त्याला स्वयंपाक घरातून, दूध जळण्याचा वास आला, नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट झाला, तो धावत आत गेला, त्याच/तिच ह्रदय धडधड़त होत, त्याच्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत होत, त्याने तिला उचलून घेतल, डोळे त्याचे झरत होते, तिच्या करपलेल्या काचेवरूनहात त्याचे फिरत होते, मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले, त्याला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग विलसले, ती म्हणाली त्याला, "एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!" "मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ दया ना!" त्याने कवटाळले तिला उराशी, अन् देवाचे स्मरण करू लागला, ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागला, पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता, त्या दोघांच अमर आलिंगन पाहून, तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............
Posted on: Tue, 24 Sep 2013 17:10:57 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015