हृदयस्पर्शी कथा :- एका - TopicsExpress



          

हृदयस्पर्शी कथा :- एका महानगरात नौकरी गमावलेला एक तरुण सिटीबस मधून उतरतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते की त्याचे पाकीट चोराने लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो. कारण त्याची नौकरी गेलेली असते आणि खिशात फक्त १५० रुपये आणि त्याने त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते. ज्यात त्याने लिहिलेले असते की ,माझी नौकरी मी गमावून बसलो आणि तुला आता काही दिवस पैसे पाठवू शकत नाही. तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट करू की नाही ह्या मनस्थितीतच त्याचे १५० रुपये आणि ते पत्र चोरी होते. १५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण त्या तरुणासाठी ते १५०० रुपयापेक्षा कमी नव्हते. काही दिवसांनी त्याच्या आईचे पत्र त्याला मिळाले. तो तरुण आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो. त्याची आई ने पत्रात लिहिले असते - बाळ, तु पाठवलेले ५०० रुपयांचे मनीऑर्डर मला मिळाले. काळजी घे स्वतःची. तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो. त्याला प्रश्न पडतो, कोणी ५०० ची मनीऑर्डर केली असेल. काही दिवसांनी परत त्याला एक पत्र येते, तोडक्या मोडक्या अक्षरात लिहिलेले, वाचण्यास अवघड पण ३ ते ४ ओळीचे - “प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए अपनी ओर से मिलाकर मैंने तुम्हारी माँ को.. मनीआर्डर.. भेज दिया है..। फिकर.. न करना। माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..! वह क्यों भूखी रहे...? तुम्हारा— जेबकतरा भाई..!!! निशा
Posted on: Mon, 18 Nov 2013 00:59:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015