Chitale got McDonalds agency in Punep आमचे येथे - TopicsExpress



          

Chitale got McDonalds agency in Punep आमचे येथे बर्गर व प्रकार मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल. We serve Burgers etc here. Also you get ketchup at Re.1 for food brought from out side. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये) The owner of this branch eats here.(Tip: Do not enquire about owners weight!) दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. Between 2 persons only 3 tissue papers will be given. Extra tissue will be charged! कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सो...य आहे. Do not sit without reason. Do not invent reason and sit. This place is meant only for eating! टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. To keep TV on or not is the sole right of management. And use of blank TV screen as mirror to comb hair is not permited. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे. When TV is on, do not sit for long hours. This is an eatery, not auditorium! Tx liked very much Pathak कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज) Please count French Fries! Complaint will not be entertained after words. (small size 17, medium 27, large size 46) गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५) Customer satisfaction is our sole objective. (Business hours: 11 to 1 and 4 to 8. Complaint timing 11.00 to 11.05) पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत. If you do not get your order in first ten minutes, you may get it in next 10 minutes. No refund in case of delay. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत. Please do not gossip with sales girl on window of Drive Through. विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत. Do not ask for ketchup without any reason. Tomatoes are not free! शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी. The lid on cold drink glass is not defective - the hole is made for the straw. The lid will not be exchanged - please note! दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत. Do not inform/discuss the rates of other companys burger here. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये) Bring a box from home to take away surplus items from dish. Paper or plastic bags will not be given. Happy Meal scheme is discontinued. (Do not ask - why this notice is permanent?) आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत) We do have branches! (but do not bring complaints of other branches here!) कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फो काढावेत. Please do not sit for long with the Joker statue on bench outside. Behave properly while being photographed (with the joker) शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये Throw away the glass after finishing your drink. Do not sit and keep making sounds from the straw!
Posted on: Thu, 24 Oct 2013 02:44:25 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015