...काल आसाराम बापुला अटक - TopicsExpress



          

...काल आसाराम बापुला अटक झाल्यावर एका दृष्यात त्याच्या शेकडो अनुयायी स्त्रीभक्त धाय मोकलुन रडत होत्या...काही भक्त मिडीयावर धावुन जात होते. हे दृष्य बघितलं आणि आश्चर्य वाटलं....मी कोणाच्याही भक्तीभावनेवर टिका करणार नाही कारण, मुळातच दगडाला देव मानणारी आपली संस्कृती आहे....(तर मग वाक्चातुर्य असलेल्या एखाद्या बुवामागे माणसं न धावतील तर नवलच) आणी मी खुप विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे श्रध्दा आणि अंधश्रध्दा ही दोनच Watertight compartments नाहीयेत....त्यातही काही सुक्ष्म फरक आहेत ते म्हणजे "विवेकी श्रध्दा" आणि "अविवेकी श्रध्दा" ( इथे अंधश्रध्देच्या थोडी आधी असते तिला मी अविवेकी श्रध्दा म्हणतो).... एक क्षणभर आपण समजुया की आसाराम बापु हा दोषीच आहे. पण तरीही लाखो अनुयायी निर्माण होण्यासाठी त्या माणसात काहीतरी Skill नक्कीच आहे ( सालं आपण घसा फोडुन बोललं तरी शेंबडं पोरही आपलं ऐकत नाही....शेकडो, हजारो लाखो अनुयायी तर सोडुनच द्या)...आसाराम बापुकडे उत्तम वाक्चातुर्य आहे, लोकांच्या भावनांना हात घालण्याची क्षमता आहे, लोकांचा बुध्दीभेद करण्याचं सामर्थ्य आहे ( त्याचे सर्व भक्त हे अडाणी, अशिक्षितच आहेत असं नव्हे तर अनेकजण बुध्दीमान, उच्चविद्याविभुषितही आहेत) हे जे त्याच्याकडे कौशल्य किंवा Skill आहे ते वापरुन त्याने अनेकांना आपलं भक्त बनवलं....लाखो भक्तांपैकी किमान काही हजार लोकांच्या आयुष्यात तरी त्याच्या प्रवचनाने, भाषणाने चांगले बदल घडले असतीलच की....हे बदल घडताना लोकांना तो आवडत गेला, रुचत गेला आणि पटतही गेला.....तोपर्यंत त्यांची "विवेकी श्रध्दा" शाबुत होती हे नक्की....मात्र त्याच्यावर आरोप झाले, अनेक लफडी-कुलंगडी मागे लागली, त्याने अनेक जमिनी लाटल्या, गैरप्रकार केले आणि शेवटी लैंगिक गुन्ह्यात अटकही झाली.....आणि लोकांची विवेकी श्रध्दा संपली आणि तिची जागा "अविवेकी-आंधळ्या भक्तीने" घेतली..."हमारा बापु सही है, कानुन गलत है, सोनिया गांधी-राहुल और कॉंग्रेस की मिलीभगत है" असं ते बोलु लागले, गाड्या फोडु लागले, पोलिसांवर दगडफेक करु लागले....श्रध्दा जोपर्यंत विवेकी आहे तोपर्यंत ठिक आहे पण, त्याला अविवेकाची किड एकदा लागली की तिचीच पुढे अंधश्रध्दा बनायला सुरुवात होते....(पोस्ट नीट वाचुन मग कमेंट कराव्यात ही विनंती) -सचिन मधुकर परांजपे (पालघर)
Posted on: Mon, 02 Sep 2013 03:29:30 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015