" शिवाजीने महाराष्ट्राला - TopicsExpress



          

" शिवाजीने महाराष्ट्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा दाखवून, मराठ्यांना पशूवृत्तीतून माणसांत आणून बसविले. जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती, आजहि जी पुन्हा अशक्य अशक्य अशक्य म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावीत आहे, ती नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखविली. या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवीतहि आहे. शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्षे झाली, तरी देखील त्याच्या चारित्र्याला जगाची एकमुखी मान्यता अझून मिळालेली नाही. महाराष्ट्राला तो परमेश्वरावतार वाटत असला, तरी एकट्या हिंदूशिवाय इतर सर्व जगाला तो दगलबाज, डोंगरांतला उंदीर, उपटशुंभ असाच वाटतो. पुण्यात कै. शाहू महाराज करवीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडशी प्रयोग केल्या दिवसापासून राज्यकर्त्या इंग्रेजी नोकरशाहीची शिवाजीविषयी भाषा किंचित नरमलेली आहे. निदान ओठांवर तरी बरीच साखर चमकते, मग पोटात काय असेल ते पोट जाणे! परंतु शिवछत्रपतीची जगमान्यता अझून जवळजवळ साशंकावस्थेतच आहे, असे कबूल केल्याशिवाय सुटका नाही. याचे कारण काय? राष्ट्रवीरांची कीर्ती जगविश्रुत करण्याची कामगिरी वास्तवीक इतिहासकारांनी करावयाची असते. " - प्रबोधनकार ठाकरे ह्याची मांडणी अतिशय मार्मिक प्रकारे विष्लेषण करत प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये केले आहे. त्यात ते स्पष्ठपणे हिंदवी स्वराज्य असे म्हणतात आणि त्याच शब्दाला आज आक्षेप घेणारी मात्र त्याच प्रबोधनकार ठाकरे यांची काही वाक्ये मात्र स्व:ताच्या स्वार्थासाठी वापरताना दिसतात.
Posted on: Fri, 05 Jul 2013 04:46:57 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015