नमस्कार मित्रानो , मी - TopicsExpress



          

नमस्कार मित्रानो , मी कल्पेश शिर्के आजची स्टोरी मला माझा मित्र रोहित भामरे याने सांगितली आहे . ऐकून मला पण अजब वाटले तुम्ही पण वाचा आणि सांगा तुम्हाला कशी वाटते. तर तो म्हणतो मी रोहित रामचंद्र भामरे आज तुम्हाला एक विचित्र सत्य सांगतो . या गोष्टीत भूत आहे कि नाही ते मला माहित नाही . पण हि गोष्ट मी लहान पणापासून ऐकत आलो आहे . म्हणून तुमच्या बरोबर शेअर करावीशी वाटली . नाशिक मध्ये एक विचित्र मंदिर आहे त्याला टाळीकुटेश्वर अस म्हणतात . भगवान शिव शंकराच हे मंदिर आहे आणि ते एका हिंदू स्मशानाच्या बाहेरच आहे . असा म्हणतात कि जर या मंदिरात जाऊन कोणी आपल्या हाताचे दंड किंवा मांडी थोपटली कि त्या माणसाला भूत झापटत . पण त्याला ते भ्होत का झापटत ते अजून कोडच आहे पण जर आपण या मंदिराचा इतिहास पहिला तर आपल्याला थोडा अर्थ समजू शकतो . तस तुम्ही नाशिक मध्ये कोणालाही टाळीकुटेश्वर मंदिरा बद्दल विचारलात तरी त्याचा इतिहास तो तुम्हाला सांगेल . माझ्या बाबांनी मला सांगितलं कि ते मंदिर आधी साध शंकराच मंदिर होत . पण ३० ते ४० वर्षापूर्वी टाळीकुटे नावाचा पहिलवान होता . तो तिथेच मंदिराच्या बाजूला रोज कसरत करायचा . आणि तो त्याच्या व्यायामात एवढा गुंगायचा कि घरी फक्त झोपायला आणि जेवायला जायचा. एकदा कुस्ती मध्ये त्याचा पराभव झाला व एवढी मेहनत करून सुधा अपयश आले म्हणून तो खूप अपसेट झाला आणि सगळा दोष त्याने त्या मंदिरातील देवाला दिला . आणि त्याच मंदिराच्या गाभार्यात देवा समोर स्वताला फाशी लावून घेतली. देवच्या मंदिरात फाशी लावण हा प्रकार विचित्र होता आणि काही अनर्थ होऊ नये म्हणून स्थानिक लोकांनी त्या मंदिराला त्याच माणसाच्या नावाने म्हणजे टाळीकुटेश्वर असा नाव दिल . अस म्हणतात कि अजूनही जर तिथे येवून कोणी व्यायाम केला तर टाळीकुटेश्वर त्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात आणि जर कोणी त्यांना आव्हान दिल तर ते भूत त्यांना सोडत नाही ……… स्टोरी शेअर केल्या बद्दल रोहितचे आभार तुमच्या कडे पण अशा काही सत्य विचित्र घटना असतील तर पेज ला नक्की मेसेज करा
Posted on: Thu, 27 Jun 2013 08:49:13 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015