आत्ताच शिप ऑफ थीसीयस हा - TopicsExpress



          

आत्ताच शिप ऑफ थीसीयस हा चित्रपट पाहून आलो. परीक्षण किंवा रसग्रहण नाही, पण प्रतिक्रिया नोंदवतो. दुर्दैवाने पहिली प्रतिक्रिया काही तितकीशी ग्रेट नाही. चित्रपट चांगला आहे, पण ग्रेट वगैरे नाही. छायाचित्रण आणि अभिनय या दोन बाबतीत हा चित्रपट above average असला तरी कथा-पटकथा आणि संकलन या बाबतीत उणा वाटतो. विशेषत: "संकलना "चे एरवी विशेष न जाणवणारे महत्व इथे अधोरेखित होते. पूर्वग्रह आणि कलात्मकतेचा अभिनिवेश चित्रपटाच्या गाभ्याला प्राणघातक जखमा करतात असे वाटले. अनेक दृष्ये केवळ तथाकथित श्रेष्ठ कलात्म चित्रपटात असायलाच हवी म्हणून घेतल्यासारखी आहेत. मूळ तत्वज्ञानाचे समर्थ प्रतिपादन अथवा चिंतन न करता अनेक विषय स्पर्श केले आहेत असे वाटले. (तिसरा भाग विनोदी करून तर नक्कीच एकूण अनुभूतीची ऊंची उणावली असे वाटते) आलेजान्द्रो गोन्सालेजने आपल्या त्रिकथात्मक चित्रपटात (amorres peros, 21 grams and babel) जी अचाट कलात्मक ऊंची गाठली होती त्याचे कारण घट्ट वीण असलेली कथा-पटकथा होती हे विसरता येणार नाही. आनंद गांधीने असाच त्रिकथात्मक चित्रपटाचा एक लक्षणीय प्रयत्न केला आहे असे म्हणता येईल. पण तो अपेक्षित ऊंची मात्र गाठत नाही. (बहुतेक सर्व दिग्गज भारतीय दिग्दर्शकांनी मात्र या चित्रपटाला सुपरलेटीव्ह विशेषणांनी गौरवले आहे.) (याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असे अनेकांनी म्हटले आहे , पण त्यात काही ठळक आणि फार महान पुरस्कार नाहीत, हे जाता जाता नमूद करतो.) कदाचित फारच जास्त अपेक्षा घेऊन पाहिल्यामुळे या चित्रपटाने अपेक्षित उंचीचा अनुभव दिला नसेल हेही शक्य आहे. आणि कदाचित दुसरी प्रतिक्रिया पहिलीपेक्षा निराळी असण्याची शक्यता देखील नाकारता येतं नाही. अर्थात बहुतांश हिन्दी चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट उजवा आहे यात संशय नाही. पण हा काही श्रेष्ठतेचा निर्विवाद निकष नव्हे. असो. मला तरी हा चित्रपट ऑस्करला पाठवला जावा असे वाटत असले तरी तरी याला ऑस्कर मिळेल याची खात्री वाटत नाही. नॉमिनेशन मिळण्याची 50:50 शक्यता आहे. (अर्थात आपल्याकडचे राजकारण बघता याची वर्णी लागणे अवघडच आहे.)
Posted on: Mon, 29 Jul 2013 19:32:18 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015