शेवटी क्रिकेटचा देव - TopicsExpress



          

शेवटी क्रिकेटचा देव निवृत्त झाला.... अन त्या 22 यार्ड ला पोरका करुन गेला... . . काय बोलायच आता.. 99 वर out झाला म्हणून कुणावर चिडायच.. आणि कुणाकडे पाहुन म्हणायच, अरे भितोस कशाला अजून तेंडल्या strike वर आहे ना.. सार काही क्षणार्धात संपल.. 24 वर्षांचा अजरामर प्रवास आज थांबला.. मैदानावरच तुफान वादळ शमल.. आता जिव तोडून cheer up नाही कराव वाटणार.. मैदानावर सचिन.. सचिन.. ची गुंज नाही ऐकु येणार.. अंगावर शहारे नाही उभे राहणार.. खरच खुप काही miss होणार आता... . . सचिन तुला माहीतीये तु काय दिलेस आम्हाला.. काय दिलेस या देशाला.. you never know.. . खरच.. खुप वाईट वाटतेय आज.. तु जेव्हा मैदानावर शेवटचा राऊंड मारत होतास आणि तुझ शेवटच जे speech देत होतास .. खर सांगु मलाही अश्रु अनावर झाले.. डोळ्यातुन पाणी अलगद बाहेर आले.. आणि का नाही येणार.. आज तुला देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार मिळाला.. तुला खुप-खुप शुभेच्छा.. आम्हा क्रिकेटप्रेमींच्या दु: खावर कदाचित ही छोटीशी फुंकर त्या देवाने मारली असावी.. त्यालाही हे दु:ख पाहावल नसणार.. असो.. पण तु सर्वांसाठी कधीच विश्वरत्न झालायेस... आजपर्यंत जो अपरीमित आनंद तू आम्हाला मिळवून दिलास त्याबद्दल तुझे खुप खुप धन्यवाद.... आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी खुप शुभेच्छा...।।
Posted on: Sat, 16 Nov 2013 14:38:26 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015